दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ३३
कॉलेज संपले…
आणि दोन हसरे चेहरे दोन वेगवेगळ्या दिशांना निघून गेले…
आणि दोन हसरे चेहरे दोन वेगवेगळ्या दिशांना निघून गेले…
गौरवीसाठी प्रत्येक दिवस ओझ्यासारखा होता... घड्याळाचे काटे चालत तर होते..., पण वेळ मात्र थांबली होती…
एक एक दिवस तिला महिन्यासारखा भासू लागला...
एक एक दिवस तिला महिन्यासारखा भासू लागला...
माधव नवीन नोकरीत रमला खरा..., जबाबदाऱ्या वाढल्या, कामात गुंतला… आणि रात्री उशिरा ऑफिसमध्ये काम करत असे..., त्याचे संपूर्ण कुटुंब मुंबईला राहत होते... आणि तो मात्र मुंबई बाहेर कामाला होता... त्यामुळे तो मुंबई बाहेर राहू लागला...
मुंबई बाहेरच्या त्या गर्दीतही त्याचं मन मात्र गौरवीकडेच धावत होतं...
जसं जसं दिवस सरत गेले..., तसं तसं दोघांनाही उमगत गेले... कि हे अंतर फक्त भौतिक आहे... मनांचं नाही… आणि एकमेकांशिवाय जगणं आता फक्त कल्पनेतही शक्य नव्हतं...
आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमाला एक कायमचं नाव द्यायचं ठरल होतं... आणि ते म्हणजे 'लग्न'...
आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमाला एक कायमचं नाव द्यायचं ठरल होतं... आणि ते म्हणजे 'लग्न'...
तेच एकमेव उत्तर…
तेच एकमेव स्वप्न…
ज्यात दोन वेगळ्या वाटा
एकाच आयुष्यात मिसळणार होत्या…
तेच एकमेव स्वप्न…
ज्यात दोन वेगळ्या वाटा
एकाच आयुष्यात मिसळणार होत्या…
कसेबसे दिवस ढकलत गेले… आठवणींच्या ओझ्याखाली वेळ पुढे सरकत राहिली…
आणि शेवटी तो दिवस उजाडला... कॉलेज पुन्हा उघडण्याचा दिवस...
गौरवी आता S.Y. ला आली होती… आज तिच्या दुसऱ्या वर्षाच्या कॉलेजचा पहिला दिवस होता...
सकाळी आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे एक नजर टाकली… चेहऱ्यावर तोच शांतपणा होता, पण डोळ्यांत मात्र
काहीतरी न सांगितलेली हुरहूर दडलेली होती…
काहीतरी न सांगितलेली हुरहूर दडलेली होती…
कॉलेजच्या गेटमध्ये पाऊल टाकताच
ती क्षणभर थांबली…
ती क्षणभर थांबली…
नवीन वर्ग, नवीन चेहरे, पण मन मात्र अजूनही माधवच्या आठवणीत अडकलेलं होतं…
जणू मनात कुठेतरी एक प्रश्न उमटला... आजही तेच कॉलेज… पण तो मात्र नाही…
जणू मनात कुठेतरी एक प्रश्न उमटला... आजही तेच कॉलेज… पण तो मात्र नाही…
हसण्याचा मुखवटा चढवून ती पुढे चालू लागली…
कारण आयुष्य थांबत नाही, कोणी दूर गेलं म्हणून…
पण त्या प्रत्येक पावलात माधवची सावली मात्र तिच्यासोबतच चालत होती…
कारण आयुष्य थांबत नाही, कोणी दूर गेलं म्हणून…
पण त्या प्रत्येक पावलात माधवची सावली मात्र तिच्यासोबतच चालत होती…
कॉलेजच्या गेटमधून आत येताना गौरवीचं मन आज फारच जड झालेलं होतं… हसण्याचा मुखवटा चेहऱ्यावर होता, पण आत कुठेतरी एक खोल दुःख, एक न सांगता येणारी कळ तिला गिळून टाकत होती…
“दुसरं वर्ष सुरू झालं… पण माझं मन मात्र अजूनही माधवच्या आठवणीतच अडकलेलं…”
ती आपल्याच विचारांत हरवलेली असतानाच
अचानक कुणीतरी तिच्या समोर येऊन उभं राहिलं…
“दुसरं वर्ष सुरू झालं… पण माझं मन मात्र अजूनही माधवच्या आठवणीतच अडकलेलं…”
ती आपल्याच विचारांत हरवलेली असतानाच
अचानक कुणीतरी तिच्या समोर येऊन उभं राहिलं…
गौरवी थोडीशी दचकली…
तिने हळूच मान वर करून पाहिलं… …आणि क्षणभर तिचा श्वासच अडखळला…
तिने हळूच मान वर करून पाहिलं… …आणि क्षणभर तिचा श्वासच अडखळला…
कारण समोर माधव हसत उभा होता...
तिच्या डोळ्यांना आधी विश्वास न बसणारा धक्का , मग आश्चर्य… आणि क्षणातच अश्रूंमधून उमटलेलं हास्य…
तिच्या डोळ्यांना आधी विश्वास न बसणारा धक्का , मग आश्चर्य… आणि क्षणातच अश्रूंमधून उमटलेलं हास्य…
“तु…? इथे…?” शब्दही तिला सापडत नव्हते…
माधव हलकंसं हसत म्हणाला,
“न सांगता यायचं होतं… सरप्राइज जे द्यायचं होतं तुला…”
असं माधव म्हणताच गौरवीने पटकन त्याला घट्ट मिठी मारली...
त्या एका क्षणात..., त्या मिठीत गौरवीचं सगळं दुःख जणू विरघळून गेलं होतं…
“न सांगता यायचं होतं… सरप्राइज जे द्यायचं होतं तुला…”
असं माधव म्हणताच गौरवीने पटकन त्याला घट्ट मिठी मारली...
त्या एका क्षणात..., त्या मिठीत गौरवीचं सगळं दुःख जणू विरघळून गेलं होतं…
तिच्या डोळ्यांतला थकवा आनंदात बदलला… आणि ओठांवरचं हसू खरं झालं…
दूर राहूनही प्रेम कमी होत नाही..., हे त्या दोघांनाही त्या क्षणी कळून चुकलं…
दोघांनी ठरवलं... संध्याकाळी शांतपणे भेटायचं…
फक्त दोघं… जुनी कॅफे, जुने शब्द, आणि पुन्हा एकदा
मनसोक्त बोलण्यासाठी…
मनसोक्त बोलण्यासाठी…
कारण काही भेटी फक्त भेट नसतात…
त्या मनाला पुन्हा जगायची ताकद देतात…
त्या मनाला पुन्हा जगायची ताकद देतात…
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा